बंद

    शिधापत्रिका

    तिहेरी शिधापत्रिका धोरण

    महाराष्ट्र शासनाने दिनांक 01 मे, 1999 पासून राज्यामध्ये तिहेरी शिधापत्रिका योजना लागू केली आहे.

    शिधापत्रिका

    शिधापत्रिकेचा प्रकार

    1. अंत्योदय (एएवाय) शिधापत्रिका
    2. प्राधान्य नसलेले कुटुंब (एनपीएच) कार्ड
    3. प्राधान्य कुटुंब (पीएचएच) कार्ड
    4. पांढरे शिधापत्रिका

    तिहेरी शिधापत्रिकांसाठी निकष

     

    1. पिवळया शिधापत्रिकांसाठी निकष :-
    2. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 15000/- आहे, अशा कुटुंबाना पिवळया शिधापत्रिका देण्यात येतात.

      अंत्योदय शिधापत्रिका –

      या शिधापत्रिका बी.पी.एल लाभार्थ्यामधून अत्यल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबास देण्यात येतात. सदरील शिधापत्रिका विधवा/परितक्त्या स्त्रिया अथवा दुर्धर आजाराने ग्रस्त वा अपंग, ६० वर्षावरील वृद्ध, बेघर, कुष्ठरोगी, आदिम आदिवासी कुटुंबे, हातगाडीवरून मालाची ने आण करणारे फळे व फुल विक्रेते, गारुडी, कच-यातील वस्तू गोळा करणारे, निराधार इत्यादी विशिष्ट कुटुंबाना ही शिधापत्रिका दिली जाते.

       

    3. केशरी शिधापत्रिकसांठी निकष (एनपीएच) :-
    4. खालील अटींची पूर्तता करणाऱ्या कुटुंबांना केशरी शिधापत्रिका देण्यात येतात :-
      कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रूपये 1 लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन नसावे. (टॅक्सी चालक वगळून) कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती शेतजमीन असू नये.

    5. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांकरिता निकष (पीएचएच) :- 
    6. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अतंर्गत सध्याच्या एपीएल (केशरी) गटातून कमाल वार्षिक उत्पन्न रूपये 59,000/- पर्यंत उत्पन्न असलेल्या शिधापिकत्रकांची प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून निवड करण्यात येते.

    7. शुभ्र शिधापत्रिकांसाठी निकष :-
    8. ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तीचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न रूपये 1 लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे चार चाकी यांत्रिक वाहन असेल किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नांवे मिळून चार हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती शेतजमीन असेल अशा कुटुंबांना शुभ्र शिधापत्रिका देण्यात येतात.