बंद

    कार्यक्रम

    • प्रारंभ तारीख : 01/01/2024
    • शेवट तारीख : 31/12/2026
    • ठिकाण : ---

    शासन निर्णय क्रमांक :- क्र. 1010/ प्र.क्र. 198/नापु-28, दिनांक 23/02/2012 रोजीच्या शासन निर्णयानूसार धान्य वितरणाची सुधारित पध्दतची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

    अन्न दिन :-

    संपूर्ण राज्यात प्रत्येक महिन्याचा दिनांक 7 हा दिवस (सदर दिवस सुट्टीचा असेल तरीही अन्न दिन (अन्न दिवस) म्हणून साजरा करण्यात येतो. सदर दिवशी गावातील चावडी/रास्तभाव दुकान/सार्वजनिक ठिकाणी उपस्थित असलेल्या दक्षता समिती सदस्य व इतर स्थानिक लोकांच्या उपस्थितीत जाहीर पध्दतीने शिधापत्रिकाधारकांना विहीत परिमाणानूसार धान्याचे वितरण करण्यात येते.

    अन्न सप्ताह :-

    अन्नदिनाच्या दिवशी विहीत पध्दतीने धान्य वाटप केल्यानंतर शिल्लक धान्य उर्वरित लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानातून दिनांक 8 ते 15 या लगतच्या सप्ताहात विक्रीकरीता उपलब्ध करण्यात येते. सदरचा सप्ताह संपूर्ण राज्याकरीता अन्न सप्ताह (अन्न सप्ताह) म्हणून साजरा करण्यात येतो. अशाप्रकारे संपूर्ण राज्यात शिधात्रिकाधारकांना महिन्यातून किमान 8 दिवस रास्तभाव दुकानातून हमखास धान्‍य मिळण्याची व्यवस्था करण्यात येते.