बंद

    परिचय

    एप्रिल 1966 मध्ये बृहन्मुंबई आणि ठाण्याच्या औद्योगिक संकुलात शिधावाटप यंत्रणा सुरू करण्यात आली. ज्यामध्ये ठाणे शहर, कल्याण, बेलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ यांचा समावेश होता. या सर्व क्षेत्रांचा समावेश महाराष्ट्र अन्नधान्य (द्वितीय) शिधावाटप ऑर्डर 1966 च्या तरतुदींनुसार करण्यात आलेला आहे.

    नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख हे नियंत्रक शिधावाटप आहेत. नियंत्रक शिधावाटप याचे अंतर्गत 2 उपनियंत्रक शिधावाटप यांचा समावेश आहे. उपनियंत्रक शिधावाटप आस्थापना व अंमलबजावणी इत्यादींवर देखरेख करतात. तसेच परिमंडळ कार्यालयास पाच उप नियंत्रक शिधावाटप आहेत जे प्रत्येक क्षेत्राचे प्रमुख आहेत, यापैकी 04 मुंबई आणि 01 ठाणे (शहरी) क्षेत्रात आहे.

    मुंबई आणि ठाणे परिसरात ४६ शिधावाटप कार्यालयांद्वारे शिधापत्रिकेसंबंधी सेवा दिली जाते. प्रत्येक शिधावाटप कार्यालयात दैनंदिन कामकाजाचे पर्यवेक्षण 1 ते 2 सहाय्यक शिधावाटप अधिका-यांकडून केले जाते आणि पर्यवेक्षण केले जाते. प्रत्येक शिधावाटप कार्यालयात नवीन रेशन कार्ड देणे /नाव वाढवणे , नाव कमी करणे,/शिधापत्रिका पत्ता बदल याप्रकारची काम करण्यात येतात.

    सार्वजनिक वितरणाशी निगडीत सर्व कामांसाठी सर्व सामान्य लोक शिधावाटप कार्यालयांना भेट देतात आणि त्यामुळे शिधावाटप कार्यालय हे शिधावाटप यंत्रणेचा सार्वजनिक चेहरा आहे. रेशनच्या वस्तूंचे जनतेला योग्य वितरण व्हावे यासाठी वेळोवेळी योग्य या विभागामार्फत अधिकृत शिधावाटप दुकानांच्या तपासणी करण्यात येतात. शिधावाटप कार्यालयाशी संबंधित विविध वैधानिक फॉर्म आता अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केले जात आहेत. शिधावाटप विभागाच्या कार्यक्षेत्रात एफसीआय गोदामांमधून रेशनच्या वस्तूंची वाहतूक करणे समाविष्ट आहे. या यंत्रणेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम करण्यात येते.

    (मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्र) 5 परिमंडळ

    • उपनियंत्रक शिधावाटप (अ – परिमंडळ परळ)
    • उपनियंत्रक शिधावाटप (ड– परिमंडळ सांताक्रूझ )
    • उपनियंत्रक शिधावाटप (ई – परिमंडळ वडाळा)
    • उपनियंत्रक शिधावाटप (ग – परिमंडळ कांदिवली)
    • उपनियंत्रक शिधावाटप (फ – परिमंडळ ठाणे)

    मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात एकूण 5 परिमंडळ आणि 46 शिधावाटप कार्यालये आहेत.

    राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभायार्थ्याना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत भारतीय खाद्य निगमच्या आगारातून अन्नधान्याची उचल करुन अधिकृत शिधावाटप दुकानात थेट वितरण करण्यात येते. याकरिता मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रकारीत 5 वाहतुक कंत्राटदार यांची नेमणूक शासनाने केलेली आहे.

    अ.क्र गोदामाचे नाव साठा क्षमता एकूण मे.टन मे. टन कार्यरत
    1 ठाणे कोपरी गोदाम,कोपरी कॉलनी, गावदेवी रोड, ठाणे (पूर्व) 1706 निवडणूकीच्या कामासाठी अधिग्रहित केले आहे
    2 भिवंडी गोदाम सरकारी धान्य गोदाम क्र. 2, कोर्टाच्या समोर, भिवंडी 421 302 1279.5 50
    3 कल्याण गोदाम, मुरबाड रोड, रेस्ट हाऊसजवळ, 4 व 5 आधारवाडी येथे 2596 निवडणूकीच्या कामासाठी अधिग्रहित केले आहे
    4 उल्हासनगर गोदाम, गांधी रोड, कॅम्प नं. 5, तहसिलदार कार्यालयाजवळ, उल्हासनगर-5 3142 दि. 19/8/2015 च्या पत्रान्वये सार्वजनिक बांधकाम विभागने वापर व वावर करण्यास अयोग्य असल्याचे कळविले आहे.

    धान्याची गुणवत्ता :-

    शासकीय पध्दतीने अन्नधान्याची साठवणूक व निरीक्षण यासाठी भारत सरकारचे धान्य साठवणूक, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, हापुर, उत्तरप्रदेश येथील दिर्घ कालावधीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले या कार्यालयातील तंत्र प्रशिक्षित अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून गोदामातून धान्याची उचल करण्यापुर्वी सदर धान्यसाठा सर्वसाधरण गुणवत्ता
    दर्जाचा (एफ.ए.क्यू.) असण्याची खात्री केल्यावर धान्याची उचल करण्यात येते.

    थेट वाहतूक

    लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सर्व टप्प्यांवर अधिक पारदर्शकता आणण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमित व विहित कालावधीत अन्नधान्य पोहोचविण्याकरिता सुधारीत धान्य वितरण पद्धत संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेली आहे. यातील नवीन वाहतूक पद्धतीनुसार भारतीय अन्न महामंडळाच्या बेस डेपोपासून शिधावाटप दुकानापर्यंत जिल्हावार एकाच वाहतूकदारामार्फत शासकीय खर्चाने अन्नधान्याची वाहतूक करण्यात येते.

    दि.२६ नोव्हेंबर, २०१२ व दि. २० एप्रिल, २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दोन्ही टप्प्यांची वाहतुक तसेच, मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील महानगर पालिका क्षेत्रांमध्ये अन्नधान्याची थेट वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

    स्वमालकीची व नियंत्रणाखालील एकूण वाहने
    अ.क्र. परिमंडळ कार्यालय वाहतूक कंत्राटदाराचे नाव एकूण नियमित वाहने
    1 अ परिमंडळ, परेल श्री. जे.बी.ग्रेन डिलर्स असो 26
    2 ड परिमंडळ, सांताक्रुझ क्रिएटिव्ह ग्रेन ॲन्ड ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रा. लि. ड परिमंडळ 10
    3 ई परिमंडळ, वडाळा शिरीष कार्गो सव्हिसेस प्रा.लि. 45
    4 ग परिमंडळ,कांदिवली साईनाथ ग्रेन ट्रेडर्स प्रा. लि. 35
    5 फ परिमंडळ, ठाणे आकाश ग्राहक सहकारी संस्था मर्या. 137
    एकूण 253