राष्ट्रीय ग्राहक दिन
राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. [१] ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.
- सुरक्षेचा हक्क
- माहितीचा हक्क
- निवड करण्याचा अधिकार
- म्हणणे मांडण्याचा हक्क
- तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
- ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार