बंद

    कल्याणकारी संस्था व वस्तीगृहे योजना

    कल्याणकारी संस्था आणि वसतिगृह योजना
    • तारीख : 13/02/2020 -

    शासनामार्फत बी.पी.एल दराने अन्नधान्याचे मासिक नियतन वितरीत करण्यासाठी कल्याणकरी संस्था व वसतीगृहे योजनेंतर्गत शासनाच्या मालकीच्या व शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या कल्याणकरी संस्थासह, शासन अनुदानित कल्याणकरी संस्था व वसतीगृहांमधील लाभार्थांसाठी सहामाही कालावधीसाठी नियतन मंजुर केले जाते.

    केंद्र शासनाच्या दिनांक 13.02.2020 च्या पत्रास अनुसरून केंद्र व राज्य शासनाच्या मालकीच्या/चालविण्यात येणाऱ्या शासकीय संस्था व शासन अनुदानित संस्थांना अन्नधान्याचे वाटप व्हावे याकरिता खालील सुचनांचे काटेकोरपणे पालन क्षेत्रीय कार्यालयांनी करावे.

    1. कल्याणकारी संस्था व वसतीगृहे या योजनेंतर्गत लाभ घेण्याऱ्या कल्याणकरी संस्था व वसतीगृहांना राज्य शासनाच्या संबंधित विभागाची मान्यता प्राप्त होणाऱ्या संस्थानाच अन्नधान्य वाटप करण्यात यावे.
    2. कल्याणकारी संस्था व वसतीगृहे यांनी अन्नधान्यासाठी कोणत्याही प्रकारची फी विद्यार्थ्यांकडून आकारू नये.
    3. वसतीगृहांच्या बाबतीत वसतीगृहांमध्ये एकूण लाभार्थ्यांच्या 2/3 लाभार्थी एससी/एसटी/ओबीसी प्रवर्गातील असावेत.
    4. राज्यातील खाजगी संस्था व वसतीगृहे व अन्य राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या तत्सम स्वरुपाच्या संस्था/वसतीगृहे या योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यास पात्र नाहीत. सदर संस्था व वसतीगृहांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येऊ नेये. त्यामुळे संस्थांची पात्रता तपासून संस्थांना अन्नधान्याचे वाटप करण्यात यावे.

    5. कल्याणकारी संस्था व वसतीगृहांचे लेखे लेखापरिक्षणासाठी लेखा व कोषागार विभागाच्या जीएफआर नुसार उपलब्ध असणे आवश्यक आहे.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे